ORGANISATION WITH FIRST RECOGNISED UNION STATUS FIGHTING FOR THE ADVANCEMENT OF RMS AND MMS EMPLOYEES
Wednesday, 24 April 2024
सभासदांचे हितासाठी लढणारी एकमेव संघटना, ऑल इंडिया आर एम एस अँड एम एम एस एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी सभासद व्हा आणि निश्चिन्त रहा
*कॉम्रेंड्स, एक संघटना चुकीच्या गोष्टीचा प्रचार व प्रसार करून नवीन कर्मचाऱ्यांना सभासद बनवण्यासाठी फसवून सभासद करू इच्छित आहेत. जे काम त्यांनी कधी केळे नाही अथवा त्यासाठी कधीही संघर्ष केला नाही त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी सर्वांना सूचित करण्यात येत आहे की आपण भूलथापांना बळी पडू नकात. आपली सर्कल युनियन ची वेबसाईट अपडेट केली आहे. त्यावर आपण काय केले ते सविस्तर पहायला मिळेलच. आपण दुसऱ्यांच्या कामाचे कधीच श्रेय घेत नाही. दुसऱ्या नी केलेली कामे आपल्या नावावर कधीच खपवून घेत नाही. हा सूर्य आणी हा जयद्रथ यांची खात्री करून घ्या, आम्ही काही कोणालाही फसवत नाही कामगारांच्या हितासाठी संघर्ष आणि आंदोलने आम्ही करत आहोत. संघर्षातून कधीच पळपुटे धोरण अवलंबत नाही. डिपार्टमेंट च्या खाजगीकरणाच्या लढ्यात माघार घेतली नाही आम्ही लढलो आणि सरकारला त्यांचा निर्णय मागे घ्यायला लावला. नवीन कामगार भरती, खेळाडू कोट्यातून कामगार भरती, खेळाडूंना वेतनवाढ, करोन काळातील रजा, रोस्टर ड्युटी, सुपरवायजर प्रमोशन, एम ए सी पी प्रमोशन, अनुकंपा तत्वावरील भरती, रुल 38, सी. ऑफ, आर टी एन, या व अनेक कामगार हिताची कामे आपण केली आहेत त्यासाठी संघर्ष केला आहे व यश मिळवले आहे. जुन्या पेन्शन साठी लढा तसेच आठवे पे कमिशन साठीचा आपण देत आहोत. जाचक वार्षिक इन्क्रिमेंट परीक्षा आपणच बंद केलीय. रुल 38 चा पाठपुरावा आपण च केलाय. पेकमिशन साठी चा मेमोराँडम पहा त्यात आपण काय मागितलय. दोन टर्म नंतर लीडरशिप करता येणार नाही या आदेशानुसार विरोधात कोर्टात आम्ही टाकलेल्या केसच्या स्टेवर युनियन चालवणाऱ्यांनी आम्हाला आम्ही काय करतो ते सांगू नये. सॉर्टींग असिस्टंट च्या अस्तित्वासाठी स्टे आम्हीच आणलाय. मेम्बरशिप वाढवण्यासाठी आम्ही कधीच खोटं बोलत नाही जे करतो ते ते डंके के चोट पे...एन जे सी एम चे आम्ही सभासद असून, डिपार्टमेंटल जे सी एम चे लीडर स्टाफ हे आर 3 चे जनरल सेक्रेटरी आहेत. संघटनेच्या माध्यमातून काम इतकी केलीत की त्याची गिनती करू शकत नाही. अन्यायाच्या विरोधात लढा देणारी एकमेव संघटना म्हणूनच नेहमी नंबर 1 ला असतो. कामगार बंधू आणि भगिनींनो कामगारांचे भवितव्यासाठी झगडणारी एकमेव युनियन ऑल इंडिया आर एम एस अँड एम एम एस संघटना ग्रुप सी मध्ये आपण सभासद व्हा. निश्चिन्त रहा. कामगार हित याचेशी बांधिलकी असणारी एकमेव संघटना म्हणजेच ऑल इंडिया आर एम एस अँड एम एम एस संघटना ग्रुप सी. कामगार एकजुटीचा विजय असो. सर्व सभासदांनी आपले सभासद वाढवण्यासाठी प्रत्येक नेत्याचे व कार्यकर्त्यांचे सोबत राहून प्रयत्नशील रहावे. ✊✊✊✊✊🚩🚩🚩🚩🚩*