Tuesday, 22 August 2017

संपाबाबत विचारण्यात येणाऱ्या काही प्रश्न व शंकांची उत्तरे,

कॉम्रेडस ,
संपाबाबत विचारण्यात येणाऱ्या काही प्रश्न व शंकांची उत्तरे,

१.संपाची तारीख योग्य आहे का?
नाही.याबद्दल अजिबात दुमत नाही.

२. संप गणपतीतच का?
संपाची तारीख ही CHQ च्या नेत्यांमार्फत ठरविण्यात आली व त्याप्रमाणे नोटीसही देण्यात आली.परंतु त्यानंतर महाराष्ट्र सर्कलने गणपती उत्सवाची बाब CHQ च्या निदर्शनास आणून दिली व आपली नाराजीही व्यक्त केली. बॅंगलोर अधिवेशनातही त्यावर चर्चा झाली. झालेली चुक CHQ नेत्यांच्या लक्षात आली परंतु नोटीस अगोदरच जारी झाल्यामुळे आता तारखेत बदल करणे शक्य नसल्याचे CHQ नेत्यांनी सांगितले. मात्र यापुढे संपाची तारीख महाराष्ट्र सर्कलला विचारात घेतल्याशिवाय ठरविण्यात येणार नाही अशी ग्वाही CHQ नेत्यांनी दिली आहे.त्यामुळे भविष्यात अशी वेळ येणार नाही.

३. गणपतीनिमित्त गावी  जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवर व एल टी सी वर संपाचा परिणाम होणार का?
दि.२४.८.१७ पासून रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजेचा व एलटीसी एडव्हान्सचा संपाशी काहीही संबंध नाही व तसा कोणताही नियम नाही. त्याप्रमाणे  आपण गेल्या वेळच्या संपात सर्वानी रजा घेतल्या.यावेळीही काही प्रश्न उद्भवणार नाही.कुणालाही काही अडचण आल्यास त्वरीत संघटनेशी संपर्क साधावा.

४.संपातील मागण्या योग्य आहेत का?
100%.
NPS,Shortage of staff व पाच दिवसाचा आठवडा या महत्वाच्या मागण्यांसह इतर मागण्याही तितक्याच महत्वाच्या आहेत.थोडक्यात हा संप म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे.

५.भविष्यात सरकार कोणती कामगार विरोधी ध्येयधोरणे राबविण्याच्या तयारीत आहे?
कामगार कायद्यात बदल,टास्क फोर्सची अंमलबजावणी (टपाल विभागाचे सहा भागात विभाजन),आऊटसोर्सिंग,खाजगीकरण,कंत्राटीकरण.
बोनस नाही तर त्या बदल्यात performance related incentive scheme आणणार.त्यामुळे पुढचा बोनस मिळेल याची शाश्वती नाही.
 FR 56 j अंतर्गत ३० वर्ष सर्वीस व ५५ वर्ष वय झालेल्या कर्मचाऱ्यांना अकार्यक्षमतेच्या नावाखाली सक्तीने निवृत्त करणार.

कॉम्रेडस आपण जे आर्थिक व इतर फायदे उपभोगत आहोत ते संघटनेने केलेल्या संघर्ष व त्यागाचे फलित आहे व ते टिकवून ठेवणे आपले काम आहे.आपल्याला खात्यामध्ये अजून  बराच काळ काढायचा आहे.मात्र आपले भवितव्य नक्कीच  खडतर आहे.
एक दिवसाच्या पगाराचा विचार कराल तर भविष्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार झाल्याशिवाय राहणार नाही.
एक दिवसाच्या पगारासाठी आपले अस्तित्व पणाला लावू नका ही कळकळीची विनंती.
विरोध केला नाही तर सध्याचे सरकार आपल्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही.

तरी सर्व कॉम्रेडसना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की स्वार्थी,संधीसाधु  विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता बहुसंख्येने या संपात सहभागी होऊन संप १००% यशस्वी करा व सरकारला कामगार एकजुटीचे दर्शन घडवा.

    

🇭🇰🇭🇰एन एफ पी ई झिंदाबाद🇭🇰🇭🇰
🇭🇰कामगार एकजुटीचा विजय असो🇭🇰