Monday, 13 March 2017

संप! संप! संप!


 माझ्या सर्व लढाऊ कामगार बंधू आणि भगिनींना लाल सलाम।  आपणास  आवाहन करण्यात येत आहे की, 
देशातील सर्व केंद्रिय कामगार संघटनांसह टपाल  विभागातील NFPE व FNPO या दोन्ही मान्यताप्राप्त संघटना दि.१६ मार्च २०१७ रोजी  एक दिवशीय देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी होत आहेत.    संपातील प्रमुख मागण्या !  
१) किमान वेतन रू.२६०००/- करा. त्याचा लाभ १/१/२०१६ पासून देण्यात यावा.
२) घरभाडे भत्ता ३०%,२०%,१०% पुर्वी प्रमाणेच मिळावा.
३) प्रवास भत्ता रू.५०००/- मिळावा.
४) नविन पेन्शन योजना रद्द करून २००४ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
५) महिला कर्मचार्यांसाठीची् कपात केलेली २०% बाल संगोपनाची रजा पुनश्च लागू करा.
६) फेस्टीवल अॅडव्हांस व इतर रद्द केलेले भत्ते पुनश्च लागू करा. 
७) बढती करीता व्हेरी गुड हा बेंच मार्क रिमार्क रद्द करा.
 ८) सर्व केडर मधिल रिक्त जागा १००% भरा व मूळ वेतनात ५% वेतन वाढ द्या. 
९) टपाल खात्याचे खाजगीकरण करणे बंद करा.  
तरी आपण सर्व सभासदांनी या संपात  आपल्या न्याय्य हक्कासाठी भाग घेऊन हा संप १००% यशस्वी करावा ही विनंती. 
workers are not beggars we fight for  our right 

अरविन्द शिवतरे , सर्कल  सेक्रेटरी