Thursday, 9 February 2017

नम्र निवेदन

नम्र निवेदन
माझ्या महाराष्ट्र सर्कल मधील तमाम प्रिय कॉम्रेडस ना
सस्नेह नमस्कार आणि लाल सलाम,

३३वे महाराष्ट्र सर्कल अधिवेशन मुंबई येथे एअर मेल सॅाटिंग डिविजन  तर्फे  दिमाखदार पद्धतीने पार पडले.  यामध्ये नवीन कार्यकारिणी निवडून आलेली आहे आणि मला आपण सर्वानुमते सर्कल सचिवाचा पदभार दिलात आणि विश्वास दाखवलात याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. संपूर्ण सर्कलच्या न्याय्य मागण्या , हक्क , अधिकार यासाठी मी माझ्या पूर्ण क्षमतेने सर्वोतोपरी प्रयत्न करील अर्थात  पण आता आपली सर्वांची जबाबदारी हि वाढली आहे. आपण जेव्हा संघटनेचे पद स्वीकारतो तेव्हा   आपण  काही गोष्टींचे पालन करायला हवे व आपल्या सभासदानाही तसे वागण्यास सांगायला हवे. उद :  आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर राहण्याचा प्रयत्न काटेकोरपणे पाळलाच पाहिजे. आपण रजा हवी असेल तर रीतसर अगोदर अर्ज करावा. अचानक तातडीची रजा हवी असेल तर त्वरित कार्यालयास कळवावे आपण आजारी असल्यास मेडिकल  प्रमाणपत्र कार्यालयास पोहचवण्याची व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या अनुपस्थिति बद्दल २४ तासांचे आत कार्यालयास कळवावे ओव्हरटाईम करण्याचे आदेश असतील तर त्याचे पालन करावे काही कारणाने शक्य नसेल तर असमर्थता कार्यालयास अथवा वरिष्टास लेखी कळवावी . काम करत असताना वरीष्टाचे आदेश पाळावेत  शक्यतो नाकारू नयेत पण जर आपल्या जबाबदारीपेक्षा वेगळे काम सांगितल्यास लेखी आदेशाचा आग्रह धरावा. नेहमी सरकारी कर्मचार्‍यांसाठी  असलेल्या नियमांचे पालन करावे. आपल्या खात्यांच्या वेळोवेळी नवीन नियमांची व घडामोडींची माहिती करून घ्यावी. संघटनेच्या विविध पातळीवरील अधिकारकक्षा व क्षमता जाणून घ्यावी. संघटनेच्या प्रत्येक आदेशाचे पालन करावे संघटनेच्या कामकाजाविषयी आपल्या सूचना व अभिप्राय द्यावेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे  मनोबल व उत्साह  वाढविण्यासाठी  सदैव प्रयत्न करावा.. आपण अधिक संघटीतपणे , एकनिष्टपणे  राहून संघटनेची प्रतिमा जपली पाहिजे.  त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करून खात्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे.

प्रत्येक शाखा सचिवाने स्थानिक स्वरूपाचे काम स्वतः एच आर ओ अथवा एस आर ओ यांना भेटून करावे. तसेच विभागीय स्तरावरील समस्या लेखी स्वरुपात विभागीय सचिवास कळवाव्यात म्हणजे  त्या समस्या तो वरिष्ट अधिकाऱ्याकडे सोडवण्यास घेऊ शकतो. समस्या मांडताना शक्यतो त्यावरील उपाययोजनाही सुचवाव्यात म्हणजे  प्रश्न लवकर सुटण्यास मदत होते. विभागीय सचिवाने सदर समस्या प्रवर अधीक्षक अथवा अधिक्षकाकडे लेखी स्वरूपत घ्यावेत मासिक मिटींगला आपल्या शाखा सचिव तसेच सर्कल पदाधिकार्‍यास घेऊन जावे. जर प्रश्न विभागीय पातळीवर सुटला नाही तर तो आपण आपल्या रिजनल सचिवास द्विमासिक मिटींगसाठी घेण्यास सांगणे. रिजनल सचिवाने सदर प्रश्नाचा पाठपुरावा रिजनल पी.एम.जी. बरोबर घेऊन करावा व सादर मिटींगला  विभागीय सचिव अथवा इतर सर्कल पदाधिकार्‍यास घेऊन जावे. जर तो प्रश्न रिजनल स्तरावर न सुटल्यास तो फोर मंथली साठी आपण सर्कल सचिवाकडे रिजनल कार्यालयाचे उत्तरासह आणि उपाय योजनेसह सविस्तर लिहून कळवावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोणताही प्रश्न अथवा समस्या असल्यास आपण वरिष्ट अधीक्षक अथवा अधीक्षक अथवा रिजनल पी.एम.जी. यांचेकडे घ्यावा व त्याची एक प्रत आपण सर्कल सचिवास पाठवावी. आपण त्यासाठी पुढील ईमेल वर पत्राचार  करावा. arvindshivtare@gmail.com अथवा nfpemhr3@gmail.com  व लेखी स्वरुपात एक प्रत सर्कल सचिवास पाठवावी. नेहमी आपली वेबसाईट r3chq.blogspot.in,  nfpemhr3.blogspot.in तसेच nfpe.blogspot.in ला भेट द्यावी. आर. एम. एस. वर्कर चे नियमित वाचन करावे. सर्व शाखा सचिव , डिविजन सचिव यांनी आपले फोन नंबर सर्वासाठी उपलब्ध करावेत म्हणजे सर्व सभासद आपल्या समस्या आपल्या कडे मांडतील.  सर्व शाखा सचिव, विभागीय सचिव व सर्कल कार्यकारिणी सदस्य यांनी आपसात सलोख्याने राहावे व आपल्या मुळे संघटनेत कोणताही वाद निर्माण होऊ देऊ नये. विभागीय सचिवाने  सी.एच क्यु. , सर्कल तसेच शाखेचा कोटा वेळच्यावेळी अदा करावा त्यात विलंब करू नये कि ज्याने करू आर्थिक कारणाने संघटनेचे कामास बाधा येईल.  या सर्व गोष्टीं आपणास माहित आहेतच मी फक्त आपल्या पुढे प्रदर्शित केल्या आहेत. आपण नेहमीच संघटनेच्या सभासदांचे हिताचा विचार करायला हवा तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करायला हवा व सभासदात संघटनेविषयी आपुलकी निर्माण व्हायला हवी.

आपण माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आणि मोठी जबाबदारी पेलण्याची उमेद दिलीत. मी आणि सर्कल कार्यकारिणी तसेच आपण सर्व मिळून आपल्या सभासदांच्या शक्य त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. मी आपणा सर्वांच्या सदैव ऋणात राहू इच्छितो आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

धन्यवाद,
                                                                                                आपला

                                                                                                कॉ. अरविंद शिवतरे

९४०४९६२७४५, ९७६२७६८२०१